19 May 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीला धाराशिवमध्ये मिळाली मोठी ऑर्डर, 6 महिन्यात 200% परतावा, आता अजून तेजी येणार

Suzlon Share Price

Suzlon Energy Share Price | अक्षय ऊर्जा कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये शुक्रवारी किंचित वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला मिळालेली नवीन वर्कऑर्डर. धाराशिव (महाराष्ट्र) येथे १२० ते १४० मीटर पवन टर्बाइन जनरेटर आणि १४ हायब्रीड मेश ट्यूबलर टॉवर बसविण्याचे काम सुझलॉन एनर्जीकडे सोपविण्यात आले आहे.

ब्राइटनाईट महाराष्ट्रात १०० मेगावॅटक्षमतेचा पवन-सौर प्रकल्प विकसित करत आहे. या अंतर्गत सुझलॉन धाराशिव येथे प्रत्येकी २.१ मेगावॅट क्षमतेचे एस १२० – १४० मीटर विंड टर्बाइन जनरेटरचे १४ युनिट बसवणार आहे.

यासंदर्भात सुझलॉन कंपनीने सांगितले की, त्यांच्या प्रत्येक टर्बाइनपैकी ८० ते ९० टक्के टर्बाइन देशांतर्गत बनवलेल्या साहित्यापासून बनवले जातात. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेड इन इंडिया’ संकल्पांसाठी कंपनी कटिबद्ध आहे. या नवीन वर्क प्रोजेक्टमधून निर्माण होणारी वीज औद्योगिक (सी अँड आय) ग्राहकांना वितरित करण्याचे उद्दिष्ट असेल, असे कंपनीच्या सीईओंनी सांगितले आहे.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी
शुक्रवारी (२२ सप्टेंबर) बीएसईवर सुझलॉनचा शेअर २५.४९ रुपयांवर खुला झाला. इंट्रा-डे मध्ये कंपनीचा उच्चांक २५.८६ रुपये होता. जो 52 आठवड्यांच्या उच्चांकी 27 रुपयांच्या अगदी जवळ आहे. सुझलॉनचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 6.60 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे बाजार भांडवलही ३४,५३६.४८ कोटी रुपये आहे.

सहा महिन्यांत २०० टक्क्यांहून अधिक वाढ
मागील ६ महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरची किंमत तब्बल २२६ टक्क्यांनी वाढली आहे. तर महिनाभरापूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत २२ टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे गेल्या 5 दिवसांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Suzlon Share Price on 24 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x