३० डिसेंबर : सुरवातीपासूनच राजकीय वादात अडकलेल्या पद्मावती सिनेमाचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होताना दिसत नाही. अगदी सेन्सॉर बोर्डाने ही पासिंग सर्टिफिकेट नाकारल्याचे समजतंय. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार की नाही हे अजून जुलदस्त्यातच आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने ही काही बदलांसह पद्मावती सिनेमाला मंजुरी देण्याचे मान्य केले आहे. या सिनेमाच्या मूळ नावात थोडे बदल करून ते ‘पद्मावत’ असे करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून रिलीज होण्यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात होती. हा सिनेमा रजपूत राणी पद्मावतीच्या जोहाराच्या कथेवर ‘पद्मावती’ हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटाची मूळ कथा ही ‘पद्मावत’ या काव्यातून घेण्यात आली आहे आणि हाच धागा पकडून सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ हे नाव सूचित केल्याचे बोलले जात आहे.

हा सिनेमात राजपुतांना आणि राणी पद्मावतील चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचे सांगत पद्मावती राणीच्या वंशजांनी देखील या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. सर्वात जास्त विरोध राजस्थानात करणी सेनेने केला होता आणि त्या विरोधात आंदोलन ही केलं होत. गुजरात निवडणुकीचे पदधाम वाजत असल्याने कोणता ही वाद नको म्हणून पहिल्यांदा भाजप शासित गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्या राज्य सरकारने आधीच बंदी घातली होती.

आता प्रेक्षकांना एकच उत्सुकता लागून राहिली आहे आणि ती म्हणजे ‘पद्मावती’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला थिएटर मध्ये कधी झळकणार त्याची.

Padmavati Prasoon Joshi CBFC Chief Sanjay Leela Bhansali