कणकवली : पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत, असे निर्देश तसेच इशारे लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र मुजोर हायवे ठेकेदारांनी यातील कोणतीही कामे केली नसल्याचा फटका वाहन चालक आणि सर्वसामान्यांना बसला आहे. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे.
मोदी सरकारमध्ये मेरिट वर असलेले मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या शैलीतून कंत्राटदारांना धारेवर धरत असतात, परंतु त्यात हेतू मात्र जनहिताचा असतो म्हणून कि काय त्यांच्या विधानांना कोणी विरोध करत नसावेत. तसच काहीस घडलं होतं, बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना इशारा वजा धमकीच देऊन टाकली होती.
नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. ‘काम योग्य नाही झालं तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन’, अशी इशारा वजा धमकीच त्यांनी कंत्राटदारांना देऊन टाकली होती. अर्थात त्या मागे त्यांचा हेतू जनहिताचाच होता असे म्हणायला हरकत नाही. पण त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गरिबांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये असं त्यांच नेहमी प्रामाणिक मत असतं, आणि देशातील पैसा हा कंत्रादारांचा नसून तो सामान्य गोरगरिबांचा आहे हे विधान करायला ते विसरले नव्हते.
