4 May 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Devendra Fadanvis, Anil Shidore, Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

मनसेने स्थापनेपासूनच या विषयाची मागणी उचलून धरली होती. दरम्यान मुख्यंत्र्यांनी कायदेशीर तरतूद करण्याचे देखील सभागृहात मान्य केलं हे ही स्वागतार्ह आहे, असं ट्वीट शिदोरे यांनी केलं आहे. तसेच, प्रत्येक शाळेत याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं आपली जबाबदारी असल्याचं शिदोरेंनी म्हटलं आहे.

नेमकं काय ट्विट केलं आहे अनिल शिदोरे यांनी?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x