7 May 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
x

नालासोपारा एसटी आगारात स्थानिकांची गावाला जाण्यासाठी गर्दी

S T Mahamandal Bus, Nalasopara, Corona Virus

नालासोपारा, ११ मे: राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आजपासून मोफत एसटी सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र सरकारच्या या घोषणेचे तीन तेरा वाजले आहेत. नालासोपारा एसटी आगारात जमललेल्या प्रवाशांना तुम्हाला गावाला जाण्यासाठी एसटीतून मोफत प्रवास करता येणार नाही, असं सांगितलं जात आहे. मोफत प्रवासाची सुविधा राज्यातील नागरिकांसाठी नसून परराज्यातील नागरिकांसाठी आहे, असं सांगत या प्रवाशांकडून डबल भाडं आकारण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून नालासोपारा एसटी डेपोत एक ते दीड हजार प्रवाशांनी गर्दी केली आहे.

राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास करण्याची सोमवारपासून सुविधा मिळणार असल्याचं सांगण्यात आल्यानंतर आज अनेक डेपोंमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. नालासोपारा पश्चिमेलाही एसटी आगारात आज हजारो प्रवाशांनी सकाळीच गर्दी केली. अनेकांच्या हातात २२ जणांची यादी होती. मात्र एसटी डेपोत आल्यानंतर त्यांना वेगळच चित्रं पाह्यला मिळालं. आम्ही डेपोत आल्यावर तुम्हाला एसटीने मोफत प्रवास करता येणार नाही. ही सुविधा राज्यातील नागरिकांसाठी नसून परराज्यातील नागरिकांसाठी आहे. तुम्हाला तुमच्या गावाला जायचे असेल तर डबल भाडं आकारावं लागेल, असं आम्हाला डेपोतून सांगण्यात आल्याचं मंगशे चव्हाण या प्रवाशाने सांगितलं.

दुसरीकडे एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविले आहे.

नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे २५० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे ५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले . त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे ३ हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.अशा प्रकारे दिवसभरात सुमारे ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य एसटीने लिलया पेलले आहे.

 

News English Summary: Passengers gathered at the Nalasopara ST depot are being told that you will not be able to travel through the ST for free to reach the village. The free travel facility is not for the citizens of the state but for the citizens of foreign countries, saying that double fare is being charged from these passengers.

News English Title: Story no free intrastate bus travel in Nalasopara bus depot at Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x