 
						Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला विलग करण्यात आले आहे. आता या कंपनीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिस कंपनीचे प्रवर्तक कंपनीतील आपला हिस्सा वाढवत आहेत.
सध्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे एकूण 46.77 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर लिस्टिंगच्या वेळी त्यांच्याकडे फक्त 45.8 टक्के भाग भांडवल होते. ४५.८ टक्के होते. यावरून कळते की, प्रवर्तकानी स्टॉक खरेदी करून आपले भाग भांडवल वाढवले आहेत. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 218.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. सप्टेंबर 2023 च्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी 6.1 कोटी शेअर्स खरेदी करून आपले भाग भांडवल वाढवले आहेत. दरम्यान, म्युच्युअल फंडांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीतील आपला वाटा 6.27 टळले कमी करून 4.71 टक्केवर नेला आहे.
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी ही काही प्रमाणात स्टॉक विक्री करून आपला हिस्सा कमी केला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये FII ने एकूण 26.4 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. हे प्रमाण पूर्वी 21.58 टक्के होते.
सप्टेंबर 2023 तिमाहीपर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमधील 6.6 टक्के भाग भांडवल LIC ने धारण केले होते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जर झाल्यावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 265 रुपये किमतीवर आणि NSE इंडेक्सवर 262 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 210.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		