4 May 2025 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

ब्रिटीश हेराल्ड: मोदी जगात पॉवरफुल? इथेही खोटी प्रसिद्धी? ते ऑनलाईन मॅगझीन एका भारतीयाचं

Narendra Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्ती बनल्याचे ब्रिटीश हेराल्ड’ने २०१९ च्या सर्वेक्षणातून पुढे आले. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि सर्वच प्रसिद्ध प्रसार माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध केल्या. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी स्वतःच्याच वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील एकूण २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता.

दरम्यान अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर केवळ ४ उमेदवारांची नावं ठेवण्यात आली. परंतु, काही ठराविक मीडिया चॅनल्सने आणि भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या नेत्यांनी ब्रिटीश हेराल्ड हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ऑनलाईन वेब पोर्टल असल्याचे म्हटले आहे. परंतु, हे वेबपोर्टल एका भारतीय नागरिकाचे असून नुकतेच म्हणजे ६ मार्च २०१८ रोजी रजिस्टर्ड करण्यात आले आहे त्याचा खाली पुरावा.

नॅशनल हेराल्डच्या यादीत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या ४ नेत्यांची अंतिम नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, सखोल चौकशीअंती केवळ नावात ब्रिटिश असलेले हे मॅगझिन ब्रिटिशांनी स्थापन केलेले नसून हेराल्ड मिडीया नेटवर्क नावाची भारतीय माणसाची ही कंपनी आहे. केरळमधील कोचीन हेराल्डचे संपादक अन्सिफ अशरफ हेच या ब्रिटीश हेराल्डचे मालक आहेत. अशरफ यांचे या कंपनीत एकूण ८५ टक्के शेअर्स असून मार्च २०१८ मध्ये हे ऑनलाईन मॅगझीन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध मॅगझिन असल्याचे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. तरीही, अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ब्रिटीश हेराल्डचे ट्विट रिट्विट करत हा भारताचा मोठा सन्मान असल्याचं म्हटलं आहे.

अनेक बाबींमुळे ब्रिटीश हेराल्डला आंतराराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेलं म्हणणं म्हणजे विनोद ठरेल.

  1. ग्लोबल अलेक्सा रॅन्कींगमध्ये या मॅगझीनला २८१५८ वे रॅन्कींग आहे. (इंडिया टाईम्सला १९० वे तर एनडीटीव्हीला हेच रँकिंग ३९५ आहे).
  2. ट्विटरवर या मॅगझीनचे केवळ ४१२५ फॉलोअर्स आहेत. (जगप्रसिद्ध बीबीसी किंवा सीएनएनचे फॉलोअर्स मिलीयन्सच्या आकड्यात असतात. विशेष म्हणजे तुलनेत अनेक जिल्हास्तरीय मीडिया एजन्सीजचे फॉलोवर्स जास्त आहेत)
  3. फेसबुकवर या मॅगझीनला फक्त ५७००० फॉलोअर्स आहेत.
  4. मोदींबाबतच्या या पॉवरफुल ट्विटला या मॅगेझिनच्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ २४२ रिट्विट मिळाले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या