
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत चांगली कमाई करून दिली आहे. 483 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तीन टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीचे आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचे अनऑडिट केलेल्या आर्थिक निकालावर संचालकांची मंजुरी घेण्यात आली होती. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी विकास इकोटेक स्टॉक 3.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 60.74 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 57.69 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 134.33 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने या तिमाहीत 2.35 कोटी रुपये PBT नोंदवला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2.08 कोटी रुपये PBT नोंदवला होता. नुकताच विकास इकोटेक कंपनीने सेबीला कळवले आहे की, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल लिमिटेड कंपनीसोबत मर्जर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आणि प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपीची मर्जर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड कंपनीचे मर्जर करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपीची सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे. Vrinda Advanced Materials Limited या कंपनीची स्थापना 2007 साली करण्यात आली होती.
या कंपनीची राजस्थान राज्यात उत्पादन सुविधा केंद्र आहे. ही कंपनी विशेष पॉलिमर संयुगे, कृषी उत्पादने इत्यादी व्यवसायात गुंतलेली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने तब्बल 192.1 कोटी रुपये कमाई केली होती. आणि त्यांतून कंपनीने 9.35 कोटी रुपये नफा कमावला होता.
वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स ही एक कर्जमुक्त कंपनी असून तिची एकूण संपत्ती 69.14 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने देखील आपले कर्ज कमी करण्याची योजना तयार केली आहे. आत्तापर्यंत या कंपनीने अनेक बँक कर्ज परतफेड केले आहेत. म्हणून कंपनीच्या नफ्यावर देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.