11 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Prakash Steelage Share Price | लॉटरी शेअरची किंमत 9 रुपये, महिन्याभरात 87% परतावा दिला, मागील 5 वर्षात 2400% परतावा

Prakash Steelage Share Price

Prakash Steelage Share Price | प्रकाश स्टीलेज कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या ज्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 103 टक्के वाढले आहेत.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 10.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रकाश स्टीलेज स्टॉक 3.94 टक्के घसरणीसह 9.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रकाश स्टीलेज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 रुपयेवरून वाढून 10 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील पाच वर्षात प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात प्रकाश स्टीलेज कंपनीचे शेअर्स 40 पैशांवरून वाढून 10.31 रुपये किमतीवर पोहचले होते.

प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10.31 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.29 रुपये होती. प्रकाश स्टीलेज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 180.43 कोटी रुपये आहे. जून 2022 मध्ये प्रकाश स्टीलेज कंपनीने 16.72 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. तर जून 2023 मध्ये या कंपनीची विक्री 73.69 टक्के वाढून 29.04 कोटी रुपयेवर पोहचली आहे. जून 2023 मध्ये प्रकाश स्टीलेज कंपनीने 21.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी जून 2022 तिमाहीत हा कंपनीने 1.89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो या जून तिमाहीपर्यंत 1012.62 टक्के वाढला होता. प्रकाश स्टीलेज कंपनीचा EBITDA जून 2023 मध्ये वार्षिक आधारावर 21.33 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीच्या EBITDA मध्ये वार्षिक आधारावर 901.41 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Prakash Steelage Share Price NSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

Prakash Steelage Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x