5 May 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल
x

देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी

Narendra Modi, Amit Shah, mamta banarjee

नवी दिल्ली : भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती, परंतु देहात मागील ५ वर्षात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सा्ंगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रचंड तणाव वाढलेला आहे. ममता बॅनर्जी यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ममता बॅनर्जी यांनी गैरहजेरी लावली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दररोज हिंसक घटना घडत असून कोणाचा ना कोणाचा जीव देखील जात आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन निर्दयीपणे हिंसा करत एकमेकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे.

त्यामुळे देशातील आणीबाणीला ४४ वर्ष उलटली असली तरी आज मोदी आणि अमित शहांच्या राजवटीत खरी आणीबाणी आहे आणि ती मागील ५ वर्षांपासून देशात आहे अशी खरमरीत टीका सध्या विरोधक करताना पाहायला मिळत आहे.

या संदर्भात काय म्हणाल्या आहेत ममता बॅनर्जी नेमकं?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या