14 December 2024 2:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

चिंता वाढली! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू

Corona Crisis, Covid 19, India

नवी दिल्ली, ३० एप्रिल: देशात मागील २४ तासांत १,७१८ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३३,०५० वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोना विषाणूचे देशातील संक्रमण रोखण्याच्या दृष्टिने सुरु असणारे प्रयत्नांना सकारात्मक यश मिळत आहे, असेही आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट होणारा आकड्याचा वेग आता मंदावला आहे. ११ दिवसांनी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होत आहे. हे दिवस वाढत जातील तसे आपण कोरनावर नियंत्रण मिळवू, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. यापुढे काय उपाय योजना करायच्या तेदेखील स्पष्ट होईल. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी देशातील सर्व राज्यांचा आढावा घेतला.

देशात आतापर्यंत १०७४ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मागील २४ तासांत ६३० रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा हा ८ हजार ३२५ वर पोहचला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी मागील १४ दिवसांच्या तुलनेत सुधारणेसह २५.१९ टक्के असा झालाय. कोरोनाचा देशातील मृतदर हा ३.२ टक्के इतका असून मृतांमध्ये ७ ८ टक्के लोक अन्य आजाराने त्रस्त होते, अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

News English Summary: In the last 24 hours, 1718 new cases have been detected in the country, bringing the total number of corona cases to 33,050. The Union Ministry of Health informed in this regard. Efforts to curb the spread of the corona virus in the country are having a positive success, said Love Agarwal, Joint Secretary, Ministry of Health. The rate of doubling the number of corona victims in the country has now slowed down.

News English Title: Story Corona crisis 1823 New Cases And 67 Deaths Reported In The Last 24 Hours The Total Number Of Covid19 Positive Cases In India Rises To 33610 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x