14 May 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार

ajit pawar, ncp congress, bjp, shivsena, bjp maharashtra, devendra fadnavis, uddhav thackeray

सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

पुढे अजित पवार म्हणाले दरवर्षी मुंबई महानगरपालिका नालेसफाई झाल्याचा दावा करते आणि प्रत्येकवर्षी तो दावा फोल ठरतो. सरकार यावर काहीच खबरदारी घेत नसल्याने माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत. जे आधीच आहे तेच सरकारला आणि महानगरपालिकेला सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ६० जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x