Mumbai Cruise Rave Bust | आर्यन खानची NCB'कडून कसून चौकशी | अनेक आरोपींच्या अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स

मुंबई , ०३ ऑक्टोबर | मुंबईजवळ समुद्रात, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या छाप्यात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह 13 लोकांना ताब्यात घेतले आहे. ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझमधून पकडलेल्या 8 जणांना (Mumbai Cruise Rave Bust) अटक केल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, त्यांच्या नावांची अद्याप एनसीबीकडून पुष्टी झालेली नाही. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचीही या प्रकरणात चौकशी केली जात आहे.
Mumbai Cruise Rave Bust. Bollywood superstar Shah Rukh Khan’s son, Aryan Khan, was detained on Sunday by the Narcotics Control Bureau (NCB) over a drug seizure on a cruise ship off Mumbai coast last night. According to the sources, Aryan Khan is currently being questioned by the agency’s sleuths :
क्रूझवर एका मोठ्या अभिनेत्याची मुलगीही उपस्थित होती:
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या अभिनेत्याची मुलगीही क्रूझवर उपस्थित होती. मात्र, तिला ताब्यात घेण्यात आले आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. क्रूझवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनही उपस्थित होता. तो रेव्ह पार्टीचा भाग होता की नाही याची एनसीबीने पुष्टी केलेली नाही.
अंडरगर्मंटमध्ये ड्रग्स लपवून नेली होती:
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर जात असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सामील असलेल्या लोकांनी ड्रग्स त्यांच्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागामध्ये आणि कॉलरच्या शिलाईमध्ये लपवून नेली होती. पार्टीमध्ये सामील असलेल्या आणखी काही लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि त्यांच्यामध्ये ड्रग्सची पुष्टी झाल्यानंतर त्यांना अटक किंवा ताब्यात घेतले जाईल.
सध्या NCB या लोकांची करत आहे चौकशी:
1. मुनमुन धमेचा 2. नुपुर सारिका 3. इस्मीत सिंह 4. मोहक जैसवाल 5. विक्रांत छोकर 6. गोमित चोपड़ा 7. आर्यन खान 8. अरबाज मर्चेंट
आर्यन व्यावसायिकाच्या मुलासह क्रूझवर गेला होता:
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन अरबाज नावाच्या व्यक्तीसोबत क्रूझवर गेला होता. आर्यन हा व्हीव्हीआयपी पाहुणा होता, त्यामुळे त्याला प्रवेश शुल्क नव्हते. अरबाज हा एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला तपासादरम्यान त्याच्या शूजमधून ड्रग्स सापडले आहेत. NCB च्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाइल फोन जब्त केला आहे.
प्रवेश शुल्क 80 हजार ते 5 लाख रुपये होते:
क्रूझवर चालणाऱ्या या पार्टीचे प्रवेश शुल्क 80 हजार ते 5 लाख रुपये सांगितले जात आहे. या क्रूझची क्षमता सुमारे 2 हजार लोकांची आहे, येथे फक्त 600 लोक उपस्थित होते. या पार्टीसाठी इन्विटेशन इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून केले गेले, ज्यासाठी काही लोकांना आकर्षक किट भेट करून आमंत्रित केले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान बॉलिवूड स्टार शाहरुखचा मुलगा आर्यनने सांगितले की, त्याला पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते आणि पार्टीला उपस्थित राहण्यासाठी त्याने पैसे दिले नाहीत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Mumbai Cruise Rave Bust NCB making deep inquiry of Aryan Khan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Olatech Solutions Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 5 महिन्यांत 300% पेक्षा अधिक परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
-
IndusInd Bank Share Price | बँकिंग शेअर, तिमाही निकालानंतर स्टॉकवर तज्ज्ञांकडून नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Deep Diamond India Share Price | 1 वर्षात 842% परतावा देणाऱ्या कंपनीने जाहीर केले स्टॉक स्प्लिट, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार?
-
Lotus Chocolate Company Share Price | या शेअर सोबत मुकेश अंबानींचं नावं जोडलं गेलं, 1 महिन्यात 122% परतावा, स्टॉक डिटेल्स
-
GCM Capital Advisors Share Price | अबब! फक्त 5 रुपयाचा पेनी शेअर, दर दिवशी 20% परतावा, खरेदी करावा?
-
Anant Raj Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील जबरदस्त शेअर, 7 महिन्यांत 180% परतावा दिला, खरेदी करणार?
-
Richest Report | सर्वात श्रीमंत 1% भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती, अर्ध्या लोकसंख्येकडे फक्त 3% संपत्ती
-
Lotus Chocolate Company Share Price | विस्तार मुकेश अंबानींच्या उद्योगाचा, लॉटरी लागली चॉकलेट कंपनीच्या शेअरची, पैसा 3 पट
-
Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला
-
2023 Hyundai Grand i10 Nios Facelift | 2023 हुंडई ग्रांड i10 निओस फेसलिफ्ट लॉन्च, किंमत 5.69 लाख रुपये