4 May 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

चिपळूण: तिवरे धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली; २३ जण बेपत्ता

Ratnagiri Tivare Dam

रत्नागिरी : मागील ४ दिवस कोकणात देखील अतिवृष्टीने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून संबंधित वाडीतील तब्बल २३ जण वाहून गेल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. वृत्त पसरताच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. पावसाच्या प्रमाणाने मर्यादा गाठली तर संबंधित धरण फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील ४ दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकार यापुढे अजून कोणते मदत कार्य पोहोचवणार ते पाहावं लागणार आहे. मध्यंतरी चिपळूणमध्ये पुलासंबंधीत दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावला होता आणि त्यानंतर राज्य सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या