
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 71664 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 21848 अंकांवर ट्रेड करत होता. अशा काळात बीसीएल इंडस्ट्रीज या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 82.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 0.72 टक्के वाढीसह 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2190 कोटी रुपये आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सध्या 37.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 100 टक्के वाढले आहे. मागील पाच दिवसांत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअर 15 टक्के मजबूत झाला आहे.
बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट 2023 रोजी 46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 80 टक्के मजबूत झाली आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 42.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअर 90 टक्के मजबूत झाला आहे. 5 मार्च 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 12 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 570 टक्के नफा मिळाला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 494.66 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील तिमाहीत कंपनीने 385.82 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत या कंपनीने 448.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 24.11 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. मागील तिमाहीत या कंपनीने 12.83 कोटी रुपये PAT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 25.16 कोटी रुपये PAT नोंदवला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.