
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण ब्लॉक डीलमुळे पाहायला मिळत आहे. मात्र तरीही शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 120.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्लॉक डीलद्वारे संवर्धन मदरसन कंपनीच्या 32.2 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 4.7 टक्के आहे. याचे एकूण मुल्य 3931 कोटी रुपये आहे. मात्र, या डीलमधील खरेदीदार किंवा विक्रेत्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
मीडिया रिपोर्टनुसार सुमितोमो वायरिंग या संवर्धन मदरसन कंपनीच्या प्रवर्तक संस्थांपैकी एक असलेल्या कंपनीने ब्लॉक डीलद्वारे कंपनीचे 4.4 टक्के भाग भांडवल विकले असण्याची शक्यता आहे. सुमितोमो वायरिंग कंपनीने डिसेंबर तिमाहीत संवर्धन मदरसन कंपनीचे 14.14 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
मंगळवारी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर 6 टक्क्यांच्या घसरणीसह 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 126.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 130 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 64.78 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स 35.22 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.