
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसात येस बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. ( येस बँक अंश )
मीडिया रिपोर्टनुसार, येस बँक सध्या नवीन प्रमोटरच्या शोधात आहे. या बातमीनंतर गुरूवारी येस बँकेचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 22.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. चालू आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसात येस बँकेच्या शेअर्समध्ये 12.8 टक्के पडझड पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 2.77 टक्के घसरणीसह 22.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील एका वर्षात येस स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार येस बँक 8-9 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनात आपले 51 टक्के भाग भांडवल विकू इच्छित आहे. येस बँकेचे सध्याचे मूल्यांकन सुमारे 7.2 अब्ज डॉलर्स आहे. मीडिया रिपोर्टनुसार सिटीग्रुप इंडिया येस बँकेचे भाग भांडवल खरेदी करू शकते. येस बँकेने गुंतवणूक करण्यासाठी पश्चिम आशिया, युरोप आणि जपानमधील अनेक बँका आणि वित्तीय संस्थां आणि गुंतवणूकदाराशी चर्चा केली आहे.
कोणत्याही गुंतवणुकदारांना येस बँकेतील 26 टक्केपेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक विशेष परवानगी घेणे अनिवार्य आहे. येस बँकेचे विद्यमान गुंतवणुकदार एसबीआय, लाईफ, एचडीएफसी बँक आणि इतर शेअरधारक आपले भाग भांडवल विकून पडू शकतात, असा देखील अंदाज मीडिया रिपोर्टमधे नमूद करण्यात आला आहे.
मात्र येस बँकेने या मीडिया रिपोर्टमधील बातम्यावर अजून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये. त्यामुळे मीडिया रिपोर्ट्समध्ये जे दावे करण्यात आले आहेत, ते किती खरे आहेत, जे जाणण्यासाठी येस बँकेच्या दुजोऱ्याची वाट पाहावी लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.