27 April 2024 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

क्रॉफर्ड मार्केटमधील कोळी समाजाला पालिकेची स्थलांतराची नोटीस; कोळी समाज कृष्णकुंजवर

Airoli Nake, crawford market fishman, Fisherman, Koli, Koli Samaj, Mumbai Koliwada, Mumbai Koli samaj

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.

मात्र त्यात अजून एक भर पडली आहे, कारण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस मुंबई महानगरपालिकेने बजावली आहे. एक ऑगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातून हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या मासे व्यापाऱ्यांना दिलेली आहे. वास्तविक त्यांची सोय मुंबईमध्ये करणे अपेक्षित असताना थेट कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना थेट मुंबईबाहेर फेकण्याचा बहाणा सत्ताधाऱ्यांना मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथे मागील ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेले आहे. येथे दररोज मोठ्याप्रमाणावर मासे विक्री होतो आणि त्यावर तब्बल १० लाख लोकं अवलंबून आहेत असं इथल्या कोळी बांधवानी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. दररोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कोळी बांधवांना थेट ऐरोलीला जाण्याच्या हालचाली झाल्याने सर्व कोळी समाज संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

जर आम्हाला येथून हलवलं तर आमचं आयुष्याचं उध्वस्त होईल अशी प्रतिक्रया अनेक मासे विक्रेत्यांनी दिली आहे. कारण आमचा रोजचा ग्राहक हा इथलाच असून आम्ही तेथे गेल्यास साहजिकच उध्वस्थ होणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला जगणंच कठीण होईल अशी संतप्त भावना कोळी बांधव व्यक्त करत आहेत. केवळ छोटे ग्राहकच नव्हे तर हॉटेल्स आणि कंपन्यांचे कँटीन चालवणारे देखील आमचे ग्राहक आहेत आणि तेच संपुष्टात येणार असेल तर आम्ही पैसे कमवायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल ते करत आहेत. मात्र पालिकेच्या एकतर्फी निर्णयामुळे या परिसरात सत्ताधाऱ्यांविरोधात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे विषयाला वाचा फोडण्यासाठी मुंबई पालिकेच्या एकतर्फि निर्णयामुळे बाधित झालेले कोळी समाजचे बांधव आज कृष्णकुंज येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी अकराच्या दरम्यान भेट घेणार आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x