8 May 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी

Raju Shetty, Prakash Ambedkar, Raj Thackeray, MNS, VBA, Swabhimani Shetkari Sanghatana, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून सध्या मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि एनसीपीच्या आघाडी करून लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी कॉंग्रेस आणि एनसीपी आघाडीसोबत होते. विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी ‘लोकशाही टिकवण्यसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. ‘त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्यास ते महाआघाडीचा भाग असतील अस विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि एनसीपीला मदत केली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि स्वाभिमानीसह वंचितही महाघाडीत सामील होऊ शकते.

मात्र राजू शेट्टी यांच्या या विधानाने भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची वेगळीच आघाडी तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसनपूर्वी राजू शेट्टी यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, तसेच योग्य वेळी प्रकाश आंबेडकर देखील राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतील अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आजच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x