12 December 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट प्रश्नी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली

MNS, Raj Thackeray, Crawford fish market

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं.

मात्र त्यात अजून एक भर पडली, कारण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस मुंबई महानगरपालिकेने बजावली आहे. एक ऑगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातून हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या मासे व्यापाऱ्यांना दिलेली होती. वास्तविक त्यांची सोय मुंबईमध्ये करणे अपेक्षित असताना थेट कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना थेट मुंबईबाहेर फेकण्याचा बहाणा सत्ताधाऱ्यांना मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

क्रॉफर्ड मार्केट येथे मागील ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेले आहे. येथे दररोज मोठ्याप्रमाणावर मासे विक्री होतो आणि त्यावर तब्बल १० लाख लोकं अवलंबून आहेत असं इथल्या कोळी बांधवानी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. दररोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कोळी बांधवांना थेट ऐरोलीला जाण्याच्या हालचाली झाल्याने सर्व कोळी समाज संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. येथील मच्छी मार्केट ऐरोली या ठिकाणी हलवण्यात येणार असून याला विरोध करतानाच कोळी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलासा देत मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले होते. तसेच मी स्वतः मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून तुमचा विषय मांडणार आहे. तोपर्यंत कोणीही आले तरी तुम्ही तिथून हलू नका, असे राज ठाकरेंनी कोळी बांधवांना सल्ला दिला होता. त्यानुसार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. प्रवीण परदेशी ह्यांची भेट घेतली आणि सदर विषय त्यांच्याकडे मांडला. ह्यावेळी मुंबईतील कोळी समाजाच्या एकूणच अडचणी ज्या मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत येतात त्याविषयी उभयतांत चर्चा झाली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x