
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. रिलायन्स पॉवर ही कंपनी नुकताच कर्जमुक्त झाली आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही चार वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24 लाख रुपये झाले असते. 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 27.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 27.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 2 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 27.70 रुपये किमतीवर पोहचला आहे.
मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 टक्क्यांनी वाढवले आहेत. 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.88 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.