3 May 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आजम खान माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा: लोकसभा अध्यक्ष

azam khan, loksabha, parliament, loksabha president, bjp, samajwadi party

गुरुवारी सपा खासदार आजम खान यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आज लोकसभेत गदारोळ सुरू होता. आजम खान यांनी माफी मागावी. तसंच त्यांना निलंबित करावं, अशी मागणी भाजपने केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणावर सर्व पक्षांसोबत बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं आहे.

गुरुवारी आजम खान यांनी लोकसभेत बोलताना सुरुवातीला एक शेर सादर केला होता. प्यारी बहेना तु कितनी बात करती है। तु इधर-उधर की ना बात कर, असं आजम खान यांनी म्हटलं होतं. त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या.

लोकसभेमध्ये तीन तलाकवर चर्चा करत असताना समाजवादी पार्टीचे खासदार सादर आजम खान यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्यावर आपत्तीजनक टिपणी केली होती. यावर आजम खान यांनी माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशी ताकीद लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x