15 May 2021 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

VIDEO | दहशतवाद्याचा भरबाजारात गोळीबार | दोन जवान शहीद | ३ दहशतवादी ठार

Security forces, Militants in Shopian, Jammu & Kashmir

जम्मू काश्मीर, १९ फेब्रुवारी: जम्मू-कश्मीरच्या शोपियांमध्ये गुरुवारी रात्री सुरक्षादलाने काही दहशतवाद्यांना घेरले. सकाळपर्यंत सुरू असलेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दुसरीकडे बडगाममध्ये एन्काउंटर दरम्यान एक SPO शहीद झाले आहेत. येथे शुक्रवारी सकाळी जवळपास 6 वाजता सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यानंतर शुक्रवारी दुपारी श्रीनगरमध्ये बागत बर्जुला परिसरात एका दहशतवाद्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये पोलिसांचे दोन जवान जखमी झाले. यानंतर दोघांनीही प्राण सोडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, एक तरुण कपड्यांमध्ये रायफल लपवून आला आणि दुकानावर उभ्या पोलिसांवर मागून गोळ्या झाडल्या. या फायरिंगनंतर दहशतवादी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याची शोधमोहिम सुरू केली आहे.

काश्मीरचे IG विजय कुमार म्हणाले की शोपियांमध्ये ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता. दोन्ही चकमकींबद्दल माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की शोपियानमधील चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याच वेळी SPO मोहम्मद अल्ताफ बडगाममधील दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झाले आहेत. या कारवाईत सिलेक्शन ग्रेडचे हवालदार मंजूर अहमद जखमी झाले आहेत.

 

News English Summary: Security forces cordoned off some militants in Shopian, Jammu and Kashmir on Thursday night. Three militants were strangled in the clashes that continued till morning. In Budgam, on the other hand, one SPO has been martyred during an encounter. The clash between the security forces and the militants started here around 6 am on Friday.

News English Title: Security forces cordoned off some militants in Shopian in Jammu and Kashmir news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x