27 July 2021 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे

Special recipe, biscuits Pedha, Indian Recipes

मुंबई, १९ फेब्रुवारी: सणासुदीला सुरूवात झाली आहे. अशा वेळी रोज घरी गोडाचं काय तयार करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे तर बिस्किटांचा पेढा हा एक वेगळा पर्याय ठरेन. आतापर्यंत तुम्ही खवा वापरून तयार केलेल्या पेढ्यांची चव चाखली असेन. आज एक हटके रेसिपी आणली आहे. ही रेसिपी म्हणजेच बिस्किटांच्या चुऱ्यापासून तयार केलेल्या चॉकलेट पेढ्यांची. चला तर पाहूया ही हटके रेसिपी कशी तयार होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

साहित्य:

  • १०० ग्रॅम बिस्किटांचा चुरा (मारी किंवा ग्लुकोज बिस्कीट)
  • १०० ग्रॅम कोको पावडर
  • २५० मिली कंडेन्स मिल्क
  • वेलची पावडर
  • डेसिकेटेड कोकोनट
  • दोन चमचे तूप
  • सूका मेवा

कृती:
बिक्सिटांचा मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घ्यावा. एका भांड्यात कोको पावडर, कंडेन्स मिल्क, डेसिकेटेड कोकोनट, वेलची पावडर आणि बिक्सिटांचा चुरा मिक्स करून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. हाताला थोडं तूप लावून मिश्रणांचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांमध्ये सुक्या मेवा भरावा आणि पेढ्याच्या आकार देऊन मग सर्व्ह करावे.

 

News English Summary: The festivities have begun. If you are wondering what to make at home every day, then baking biscuits will be a different option. By now you must have tasted the pies made using khava. Today I have brought a unique recipe. This recipe is made from chocolate biscuits made from biscuit crumbs. Let’s see how this tricky recipe is made.

News English Title: Special recipe of biscuits Pedha news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x