3 May 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News

Ajay Devgn

Ajay Devgn | फिल्मी जगामधील कलाकारांबद्दल काही ना काही अपडेट येतच असतात. त्यांच्या जीवनाबद्दल, करिअरबद्दल सोबतच पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना फार आवडते. अशातच आज आम्ही सुपरस्टार अभिनेता अजय देवगन याच्या करिअर बद्दल एक खुलासा करणार आहोत. ही गोष्ट आतापर्यंत खूप कमी लोकांनाच ठाऊक असेल. अजय देवगनचं करिअर या एका सिनेमामुळे डुबता डुबता वाचलं आहे.

1991 साली ‘फुल और काटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगन याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. फुल और काटे नंतर लगेच 1992 मध्ये त्याचा ‘जिगर’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एन्ट्री केली होती. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.

1992 पर्यंत अभिनेत्याची त्याच्या हिट चित्रपटांमुळे सर्वत्र वाहवाह होती. परंतु 1993 मध्ये त्याचे एका मागोमागे एक सिनेमे फ्लॉप होत गेले. तेव्हा अनेकांना वाटलं की, आता अजय देवगनचं करियर संपल्यातच जमा आहे. परंतु देव कधी कोणाची घडी बसवेल याचा काही नेम नाही. अजयच्या या सुपर डुपर हिट सिनेमामुळे त्याच्या करिअरला एक वेगळाच वळण लागलं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अभिनेत्याच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटाबद्दल आम्ही सांगत आहोत. मुख्य अभिनेत्री रविना टंडन आणि अभिनेता अजय देवगन यांचा या चित्रपटामुळे अभिनेत्याचा करियर फारच सुधारलं. त्याकाळी दिलवाले या चित्रपटाने तब्बल 11.98 करोड रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रोमान्स, डान्स आणि फुल ॲक्शन ड्रामा असलेली ही फिल्म प्रेक्षकांना फारच आवडली होती.

Latest Marathi News | Ajay Devgn Bollywood Superstar Phool Aur Kante Movie Fact 07 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajay Devgn(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या