2 May 2024 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे: फडणवीस

CM Devendra Fadnavis, EVM, Ballet paper, Raj Thackeray

वर्धा: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, एनसीपी नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस वर्धा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळमुक्ती हे आमचे यापुढील ध्येय असेल. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत केलेली कामे जनतेला सांगत आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे असं सांगतानाच या मुद्यावर विरोधकांची एकजूट होऊन काही फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावं. आम्हाला कामं करता आली नाहीत, भविष्यात ती करू असं सांगितलं तरी जनतेकडून तुम्हाला सहानुभूती मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x