 
						Smart Investment | प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईचा काही हिस्सा भविष्याच्या गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवतो. अशा स्थितीत प्रत्येकाला अशी योजना हवी असते जी अत्यंत छोट्या गुंतवणुकीतून देखील दीर्घकाळात मोठी रक्कम तयार करू शकेल. भारताची सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच LIC. तुम्ही LIC च्या सुरक्षित योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन मोठा तयार करू शकता.
आम्ही एलआयसीच्या ‘जीवन आनंद’ पॉलिसीबद्दल सांगत आहोत. या पॉलिसीने अनेकांना लखपती बनवलं आहे. तुम्ही केवळ 45 रुपयांची बचत करून तब्बल 25 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
असे बनतील 45 रुपयांचे 25 लाख रुपये :
समजा तुम्ही एका महिन्यासाठी दररोज 45 रुपयांची बचत केली तर, 1358 रुपये जमा होतात. समजा तुम्ही दररोजच्या 45 रुपयांच्या गुंतवणुकीचं सातत्य पुढील 35 वर्षांपर्यंत ठेवत असाल तर, मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात आरामात 25 लाख रुपयांची रक्कम तयार होऊ शकेल. म्हणजेच तुम्ही वार्षिक आधारावर 16,300 रुपये साठवालं.
बोनससह किती रक्कम मिळते पहा :
वार्षिक आधारावर काढलेली रक्कम 16,300 नुसार तुम्ही एकूण 35 वर्षांमध्ये 5,70,500 रुपयांचा मोठा निधी तयार करू शकता. म्हणजेच गुंतवणुकीची बेसिक रक्कम 5 लाखांची असेल. तुम्हाला मॅच्युरिटी पिरियडनंतर रिव्हिजनरी बोनस प्राप्त होणार जो 8.60 लाख रुपये असेल. त्याचबरोबर फायनल बोनस 11.50 लाख दिला जाईल. समजा तुमची पॉलिसी 15 वर्षांची असेल तर, तुम्हाला एकदा नाही तर दोनदा बोनस देण्यात येईल.
कर सवलत मिळत नाही तरी सुद्धा होतोय जबरदस्त फायदा :
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळत नाही. तरीसुद्धा अनेकांना जीवन आनंद पॉलिसी फायद्याची वाटते. कारण की यामध्ये कर सवलत नसली तरी सुद्धा भरपूर बेनिफिट्स अनुभवायला मिळतात. या पॉलिसीमध्ये एकूण 4 प्रकारचे रायडर मिळतात. ज्यामधील पहिले रायडर म्हणजे एक्सीडेंटल डेथ अँड डीसेबिलिटी रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर, एक्सीडेंट बेनिफिट रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर सामील आहेत.
काही कारणांमुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, त्याला एक्सीडेंटल डेथ बेनिफिट दिले जाते. हे बेनिफिट 125 टक्के असते. एवढेच नाही तर योजना मॅच्युअर होण्याआधीच पॉलिसीधारक मृत्युमुखी पावला तर, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला पूर्ण वेळ झाल्यानंतर बरोबर पैसे मिळतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		