कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे रस्ते वाहतूक बंद आहे. कोल्हापुरातील गोकुळसह इतर दूध संघाचे संकलन बंद आहे. दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होऊ शकला नाही. पाऊस थांबल्याने पूर ओसरू लागला असला तरी आता रोगराई पसरण्याची भीती आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर परिसरातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आज मात्र जेव्हा हवेतील नेते आणि मंत्री गिरीश महाजन कोल्हापूरच्या जमिनीवर अवतरले आणि पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांचा एकूण वागणुकीत कोणतेही गांभीर्य प्रसार माध्यमांना दिसत नव्हते. भाजपच्या उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत दौरा करत असताना त्यांचं संपूर्ण पक्ष सेल्फी आणि व्हिडिओशुटकडे असल्याचं दिसत होतं. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ते पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये हसत हसत हातवारे करत स्वतःची उपस्थिती दाखवण्याच्या व्यस्त होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूरकर आणि एकूणच महाराष्ट्रावर ओढवलेल्या नैसर्गिक आप्पतीबद्दल किती गांभीर्य आहे याचा प्रत्यय येतो आहे. त्याच्या दौऱ्यातील हास्याचे व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांच्या हाती लागले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीच्या प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले असताना आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. शैलजा पाटील, मागील ४ दिवसापासून स्वतः पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पोटापाण्याचं पाहण्यासाठी आपल्या सहकारी महिलांसोबत जेवण तयार करून, सांगलीतील पूरग्रस्त गावांमध्ये जेवणाचे पाकीट वाटत होण्याची योग्य काळजी घेत आहेत. दरम्यान सांगलीतील विविध पूरग्रस्त गावातील प्रतिदिन जवळपास ५ हजार लोकांना ते जेवणाचे पाकीट स्वयंसेवकामार्फत पोहोचविण्याची जवाबदारी पार पाडत आहे आणि ते कौतुकास्पद आहे. त्यांनी मागील ४ दिवसापासून त्यांचा हा रोजचा दिनक्रम पाळला आहे. सागंलीकरांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी दिलेल्या प्रेमापोटी जयंत पाटील यांचे संपूर्ण कुटुंब सांगलीकरांच्या मदतीला मैदानात उतरले आहेत.

 

कोल्हापूर: फिल्मी दौरे! मंत्री गिरीश महाजन हवेतून जमिनीवर आले; तिथेही सेल्फी-हसत मजा