1 May 2024 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

पूरग्रस्त व रूग्णांच्या भेटी घेताना गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर शूज घालून

Minister Girish Mahajan, Sangli Flood, Kolhapur Flood

सांगली : दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून हसत सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगलीत पाण्यात उतरुन पुन्हा मार्केटिंग केलं. मात्र बोलण्याच्या ओघात ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती अशी माहिती देताना अप्रत्यक्षपणे सरकार ४ दिवस झोपल्याचे सिद्ध केले होते. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच दिसले.

परंतु त्यानंतर देखील विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याने त्यांनी ट्विट करुन मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घरात बसण्यापेक्षा बाहेर पडावं. टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावं असा टोला लगावला आहे. भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना काढलेल्या सेल्फीत हसून दाद दिल्याने टीकेचे धनी झाले होते.

मात्र आता त्याचं अजून एक असभ्य आणि निष्काळजी पणे वागणं समोर आलं आहे. सोमवारी त्यांनी सांगली येथे पूरग्रस्त व रूग्णांची वैद्यकीय टीमसोबत भेट घेतली. साथीरोग नियंत्रणासाठी मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे का आणि उपचार व त्यामध्ये उदभवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी भेट दिली होती.

मात्र साथीचे रोग पसरले असताना आणि त्याठिकाणी लहान मुलं देखील आजारी असताना, मंत्री गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर थेट पायातील शूज घालूनच वावरत असल्याचं समोर येते आहे. ते पुरग्रस्तांच्या करत असलेल्या भेटीत पुरग्रस्तांच्या आरोग्याला धोका उद्भवेल असंच त्याचा या भेटी दरम्यानचा वावर दिसत आहे. त्यामुळे ते पुन्हा समाज माध्यमांवर टीकेचे धनी होताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x