27 April 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम?
x

कौतुकास्पद! प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं सांगलीतील 'ब्रह्मनाळ' गाव

VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Sangli Flood, Kolhapur Flood

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला त्यामुळे या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

यावेळी कावडे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी स्थापन केली. मात्र त्यात रिपाइला कुठेचं स्थान दिल नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. प्रकाश आंबेडकर यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता. तसेच भाजपचं वंचित आघाडी चालवत आहे, असा देखील टोला त्यांनी लगावला.

1. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.
2. ७०० कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.
3. गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.
4. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.
5. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.
6. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x