29 March 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

कागदपत्रं लीक करून ED तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय | सुनावणी सुरु

Anil Deshmukh

मुंबई, ०९ सप्टेंबर | राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. परंतु आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.

कागदपत्रं लीक करून ED तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, सुनावणी सुरु – creating Undue Sensation Violating Norms And Selectively Leaking Documents said Anil Deshmukh to high court :

अनिल देशमुखांच्या वतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत असून अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह अशी वकिलांची तगडी फौज ईडीची बाजू मांडत आहेत.

अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही:
अनिल देशमुखांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं असल्याचं देशमुखांच्या वतीने सांगण्यात आलं असून तपास यंत्रणेच्या चौकशीची गरज काय? याची माहिती देत नाहीये, तपासयंत्रणेनं अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही. या प्रकरणानं तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, असा आरोपही केला आहे.

दरम्यान प्रकरण प्रलंबित असताना, ते अवाजवी खळबळ निर्माण करत आहेत, नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि निवडक कागदपत्रं आणि माहिती लीक करत आहेत असा आरोप अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED creating Undue Sensation Violating Norms And Selectively Leaking Documents said Anil Deshmukh to high court.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x