7 May 2025 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट! ६३ ठार, शेकडो जखमी

Kabul, Afghanistan, Blast, Bomb Blast

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका लग्न समारंभात झालेल्या बॉम्बस्फोटात जवळपास ६३ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तान गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा आत्मघातकी हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास झाला.या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत काहीच सांगता येत नाही.

स्थानिक प्रसार माध्यमांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी १००० पेक्षा अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. “अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बॉम्बस्फोट झाला त्या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची भीती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या