4 May 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

भाजपा पेक्षा शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली: प्रजा फाउंडेशन अहवाल

Praja Foundation Report, Shivsena MLA, BJP MLA, Congress MLA

मुंबई : राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३ आमदारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.

विधानसभेमध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. धक्कादायक म्हणजे घाटकोपरचे पश्चिमेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी ५ वर्षांच्या कालावधीमध्ये स्वत:च्या मतदारसंघासंदर्भात एकही प्रश्न विचारलेला नसल्याचे समोर आलं आहे. हजेरीच्या बाबतीतही राम कदम यांना क्रमांक ३२ वा आहे. घाटकोपर पश्चिमेला केवळ निरनिराळे स्टंट आणि भेट वस्तूंचे आमिष दाखवून ते मतदारांना भुलवून ठेवतात आणि मतदारसंघाचे मूळ प्रश्न अधांतरीतच राहतात हे देखील अनेकदा समोर आलं आहे. त्यात मागील दहीहंडी दरम्यान महिलांसंदर्भात आक्षेपार्य विधान केल्याने संपूर्ण भाजप पक्ष अडचणीत आला होता. रक्षा बंधन सारख्या विषयावर देखील ते १०-१५ दिवस कार्यक्रम आयोजित करून चमकोगिरी करताना दिसले आहेत. असं असलं तरी दुसऱ्याबाजूला अहवालामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येत आहे.

प्रजा फाउंडेशनने गुरुवारी आमदारांच्या कामगिरीचा आढवा घेणारा २०१८-१९ या वर्षातील अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये मागील वर्षापेक्षा या वर्षी आमदारांनी समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले.

मात्र मागील वर्षी देखील प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला आहे.

आमदार राम कदम यांचा लोकप्रनिधी या नात्याने केवळ क्रमांक खालून पहिला आला नसून, तर २०१७ च्या तुलनेत त्यांची कामगिरी या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये अजूनच ढासळली आहे. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्ट नुसार भाजप आमदार राम कदम यांची २०१७ मध्ये गुणसंख्या होती ४१.९६ टक्के म्हणजे ५० टक्के सुद्धा नाही. परंतु असे असताना सुद्धा ती गुणसंख्या २०१८ या वर्षासाठी अजून खालावाली असून ती केवळ ३३.३७ टक्के इतकी झाली आहे. यावरून ते त्यांच्या मतदार संघात जितका देखावा करतात त्यापेक्षा हा रिपोर्ट काही वेगळंच निर्देशित करत आहे.

त्यामुळेच घाटकोपर मधील मतदाराला आमदार राम कदमांबद्दलचे वास्तव निदर्शनास आणून देण्यासाठी घाटकोपर पश्चिम मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी एक उपहासात्मक पोश्टर लावलं आहे, ज्याची चर्चा घाटकोपरमध्ये रंगली आहे. त्या पोश्टर’वर असा मजकूर लिहिण्यात आला आहे की,’पप्पू कान्ट डान्स साला ! गोविंदा आला रे आला ! पप्पू पुन्हा नापास झाला……जगातल्या सर्वात मोठ्या नकली भंपक गोष्टी करणारे, नको ती स्वयंम घोषित विशेषण लावणारे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्यांसाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीच्या सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा वर्षीही खालून प्रथम क्रमांक पटकवला या बद्दल त्यांचे अभिनंदन….प्रजा फाउंडेशनने केलेल्या प्रामाणिक आणि खऱ्या सर्वेक्षणाबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन !! असा मजकूर टाकून आमदार राम कदम यांची खिल्ली उडविली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x