12 December 2024 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

...तर मोदींच्या खासदारांविरोधात कांदे मारा आंदोलन | शेतकरी संघटनेचा इशारा

Kanda Maro Andolan, against BJP MP, farmers association

पुणे, १२ डिसेंबर: शेतकरी आंदोलनावरून सध्या देशभर भारतीय जनता पक्षविरोधात वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासोबतच शेतकरी विषयक इतर मुद्यावरून देखील शेतकरी संघटना भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक होतं असल्याचं पाहायला मिळतंय आणि परिणामी भाजप नेत्यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

निर्यातबंदीनंतर देशभरात कांद्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय श्रीगोंदा येथे झालेल्या नगर व पुणे जिल्ह्याच्या संयुक्त बैटकीत करण्यात आला आहे. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण, प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील घनवट यांच्या अध्यक्षतेखाली बेठक संपन्न झाली. A decision was taken at a joint meeting of Nagar and Pune districts at Shrigonda that BJP MPs would agitate to hit onions.

शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित बैठकीत हा निर्णय (The founder of the farmers’ association, late. The decision was taken at a meeting held on the occasion of Sharad Joshi’s fifth death anniversary) झाल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली. पुढे साठ्यांवर मर्यादा घातली आणि परदेशातून आयात केली. अनेक ठिकाणी व्यापांर्‍यावर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत.

अनेक शेतकर्‍यांकडे अद्यपही साठवलेला कांदा आहे. डिसेंबर आखेर व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नविन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्या नंतर अाणखी दर कोसळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारी पासून कांदा उत्पादक शेतकरी, दिसतील तेथे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.

 

News English Summary: Onion prices have fallen across the country following the export ban. Therefore, if Prime Minister Narendra Modi’s central government does not lift the ban on onion exports, onion growers will agitate to kill BJP MPs, it has been decided in a joint meeting of Nagar and Pune districts in Shrigonda. The meeting was attended by President of West Maharashtra Farmers Association, Anil Chavan, President of West Maharashtra Women’s Front Seema Narode The meeting was held under the chairmanship of Anil Ghanwat, President of the Farmers Association.

News English Title: Kanda Maro Andolan against BJP MP said farmers association news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x