30 April 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल
x

रोहित पवार यांनी अमित शहांना विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत: उद्धव ठाकरे

Central Home Minister Amit Shah, BJP President Amit Shah, Shivsena Chief Uddhav Thackeray, NCP leader Rohit Pawar

मुंबई : महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे असं सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत ५० वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत,’असं अग्रलेखात म्हटलं आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.

मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सध्या सोलापूर दौऱयावर आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. घराणेशाही, भ्रष्टाचार हा त्याच्ंया टीकेचा विषय होता. यावर ‘चौथ्या’ पवारांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा सल्ला घ्यायचा. बारामतीत येऊन सोयीनुसार कौतुक करायचे आणि निवडणुकांच्या वेळी साहेबांनी काय केले असे विचारायचे? कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असे साहेबांचे राजकारण नाही असेही रोहित पवारांनी ठणकावले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x