2 May 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून मनसे नेते नितीन सरदेसाईंची चौकशी

Kohinoor Square, Kohinoor Mill, Former MLA Nitin Sardesai, ED Notice, Raj Thackeray

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली आहे. आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांना देखील ईडीकडून बोलावण्यात आलं आहे. सरदेसाई यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.

अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास करत आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.

याच प्रकरणात ईडीने मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. ईडीच्या नोटिसीनंतर नितीन सरदेसाई चौकशीसाठी गुरूवारी दुपारी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x