29 April 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

नारायण राणे भाजपात प्रवेश करणार; युती तुटण्याची शक्यता बळावली

MP Narayan Rane, Maharashtra Swabhiman party, MLA Nitesh Rane, Former MP Nilesh Rane

सिंधुदुर्ग: शिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं सांगत मुंबईतच भाजपमध्ये प्रवेश व्हावा, अशी इच्छा, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेना-भाजपचं काहीही ठरलं तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणारच, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात येणार असल्याचं सांगतानाच नितेश राणेसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपच्या तिकीटावरच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करतानाच आपण स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये जाण्यासाठी कोणतीही अट ठेवली नसून कोणतीही मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

खा. नारायण राणे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. ‘मुख्यमंत्री फडणवीस आगे बढो, खा. राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. दोन्ही नेत्यांच्या विजयाचा यावेळी जयघोष करण्यात आला.

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा प्रवेश मुंबईत होईल, असे सांगतानाच मी ज्या दिशेने जाईन त्या पक्षाचे पारडे जडच असणार यात शंका नाही, असे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. राणे यांनी स्पष्ट केले. सेना-भाजप युतीबद्दल काहीही ठरो, मात्र आमचा भाजप प्रवेश होईल एवढा विश्वास आहे. तसा मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला असल्याचे खा. राणे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

त्यानंतर रत्नागिरीत आरेवरुन कारे करणाऱ्या आणि नाणारचं जे झालं तेच आरेचंदेखील होईल, असं म्हणत मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं म्हणत होतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उल्लेख न करता शिवसेनेला इशारा दिला आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारवर भाष्य केलं. ‘नाणार रिफायनरी संदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं घसा फोडून सांगत होतो.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x