29 April 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

ईडीच्या कार्यालयात न जाण्याची पोलीस आयुक्तांची विनंती

NCP, Sharad Pawar, ED Office, Mumbai Police commissioner

मुंबई: ईडीच्या ईमेलनंतरही शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचा पवित्रा घएतसा आगे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्यास त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सकाळपासून दुसऱ्यांदा पोलीस त्यांच्या घरी त्यांची समजूत घालण्यासाठी पोहोचले आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत आहे. तुम्ही जाणं टाळावं अशी विनंती पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. सध्या यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच पुढील माहिती देण्यात येईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. दरम्यान, कोणाच्या सांगण्यावरून शरद पवारांवर गुन्हा दाखल केला? ईडी कोणाच्या सांगण्यावरून पत्र पाठवत आहे? हे समजणं गरजेचं आहे. ईडीने पाठवलेल्या ईमेलमध्ये तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं असलं तरी आवश्यकता भासल्यास चौकशीला यावं लागेल असं सांगण्यात आलं आहे. आम्हाला ईडीने आज बोलावलं नसलं तरी आम्ही ईडीकडून आमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी जाणार आहोत, असं नबाव मलिक म्हणाले.

शरद पवारांची ५५ वर्षांची स्वच्छ राजकीय कारकीर्द राज्यातील १२ कोटी जनतेच्या समोर आहे. एमएससी. बँक प्रकरणाशी काहीही संबंध नसताना फक्त निवडणुका डोळ्यांपुढं ठेवून भाजप सरकारने त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचा प्रकार केला आहे. सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात पवार साहेब देत असलेला लढा हा केवळ त्यांच्या एकट्याचा नाही तर जनतेचा लढा आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यस्था बिघडवण्याचा आमचा कुठंही प्रयत्न नाही मात्र जर आमच्या दैवतावर सरकार कारण नसताना गुन्हे दाखल करत असेल तर जाब विचारणारच. सरकारच्या हुकूमशाही विरोधात आता सर्व महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळं ईडी सारख्या संस्था राजकारणासाठी वापरू नये हा आमचा सरकारला इशारा आहे. अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x