7 May 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

काकाचा दिलदारपणा दिसणार? मनसे वरळीतून उमेदवार देणार नसल्याचं वृत्त

Aaditya Thackeray, MNS, Shivsena, Raj Thackeray, Maharashtra Navnirman Sena, Vidhansabha Election 2019

मुबई: शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्यात ७० उमेदवारांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. इथले शिवसेनेचे प्रमुख विरोधक असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन अहिर यांनाच शिवसेनेने पक्षात घेतल्यामुळे आता हा शिवसेनेसाठी ‘सेफ’ मतदारसंघ झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरेंना कडवी टक्कर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, आता राज ठाकरे यांनी वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक अधिकच सोपी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये वरळीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिलेला नाही. वरळीतून मनसेचे संतोष धुरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात विविध कामं करत आहे. त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशी अपेक्षा होती.

एकीकडे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल पहिल्या यादीमध्ये या मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना विरोध करण्याऐवजी त्यांना मदत करताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या