चाळीसगाव: आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. या सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिलं.

आघाडीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची चाळीसगावमध्ये रविवारी सायंकाळी सभा झाली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “आपल्या भागाचा विकास करणारा एक उत्तम उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. तुमच्या सुख-दुःखात उभं राहणारं व्यक्तिमत्व निवडून येण्याची गरज आहे. राजीव देशमुख यांचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यात आपण कमी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसचे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा राज्यात येवून गेले. ते म्हणतात महाराष्ट्रात आम्हाला विरोधकच नाही. त्यांनी प्रचंड मोठी सभा घेतली त्यात ते बोलत होते. साधारण पन्नास एक जण उपस्थित होते त्यांच्या सभेला अशी यांची सभा आणि ते सांगतात की, आमच्याशी तोड नाही म्हणून अशी खिल्ली शरद पवार यांनी उडवली.

दरम्यान, मागची पाच वर्ष हातात सत्ता तुमची आणि हे इथे येऊन आम्हाला बोलतात तुम्ही काय केलं. तुम्ही जबाब द्यायला हवा पाच वर्ष सत्ता तुमच्या हाती होती. आता याचं उत्तर जनता २१ तारखेला देवून तुम्हाला धडा शिकवला शिवाय शांत बसणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. राज्यातील प्रश्न काय आणि पंतप्रधान येऊन ३७० कलमाबद्दल पवारांनी उत्तर देण्याची मागणी करतात. अरे लोकांच्या पुढे ३७० हा प्रश्न नाहीये तर शेतीच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली? कर्जबाजारीपणा का वाढलाय? हे प्रश्न सोडविण्याचे सोडून ३७० चा मुद्दा पुढे करतात असे सांगतानाच आज शेगावला एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली याची आठवण सरकारला करुन दिली.

मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही: शरद पवार