27 April 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
x

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

Shivsena, Kannad mla Harshvardhan Jadhav, Maharashtra Vidhansabha Election 2019

औरंगाबाद: कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात जाधव यांच्या गाडीची व घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्ल्याच्या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा रोष वाढला होता. सिल्लोडचे चर्चेत नाही. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांना तब्बल २ लाख ८३ हजार मते मिळाली होती. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र जाधव हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर असताना सुद्धा कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून निर्णय घेतला असल्याचे जाधव यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. विरोधीपक्षात असलेल्या आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही ही परिस्थिती असून, मी स्वत: मनसेत असताना हे अनुभवलं असल्याचे जाधव म्हणाले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांशी माझे संबध चांगले असायला पाहिजे, यासाठी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x