मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे डोंबिवलीतून मनसेचे मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण मधून मनसेचे राजू पाटील आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीतून धोक्याची घंटा असल्याचं समजतं.
मनसेचे वणी, नाशिक, मुंबई आणि पुण्यातील प्राथमिक फेऱ्यांचे सविस्तर माहिती येणं अजून बाकी असून एकूण १५ फेऱ्या होणार असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे.
