21 November 2019 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

परळीतून धनंजय मुंडे ६००० मतांनी आघाडीवर, पंकजा मुंडेंची धाकधूक वाढली

Pankaja Munde, Dhananjay Munde, Parli

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ६० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे परळीतून धनंजय मुंडे ६००० मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. परळीत बहिण भावाची लढाई रंगली आहे.

अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही लढत आहे. हे दोघे बहिण भाऊ असले तरीही ही निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. परळीतून धनंजय मुंडे यांनी ६००० मतांची आघाडी घेतली आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(23)#Pankaja Munde(16)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या