16 December 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

VIDEO: शिवसैनिकांनो मला स्वबळाचं बळ द्या, मी त्यांचे दात पाडतो, उद्धव ठाकरे पलटले

Udhav Thackeray, Shivsena, BJP Alliance, Amit Shah, Narendra Modi

मुंबई : केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

परंतु, मागील काही दिवसांपासून शिवसेनेबद्दल अनेक नकारात्मक निवडणूकपूर्व सर्व्ह प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वरवर दिसणारी देहबोली आतून भेदरल्यासारखी होती याचा प्रत्यय आज आला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणुकीआधी चालविचल झाल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कारण मागील २-३ वर्षांपासून उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना शिवसैनिकांकडून जाहीरपणे हात वर करत वचन घेतलं होतं.

मात्र शिवसैनिकांकडून घेतलेल्या स्वबळाच्या जाहीर वाचनाला स्वतःच तीरांजली दिल्याने शिवसैनिक तोंडघशी पडले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून घेतलेल वचन स्वतःच पक्षाध्यक्षांनी मोडल्याने आता बोलणार तरी कोण अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आपापल्या प्रभागात कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाल्याचे शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. शिवसैनिकांनो मला बळ द्या, मी त्यांचे दात पडतो अशी भाषा वापरणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणुकीच्या काही दिवस आधी पलटले आहेत.

VIDEO : काय म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना?

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x