14 May 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत

MP Sanjay Raut, Shivsena, Vidhansabha Election 2019

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही राज्यात सत्तेचा रथ मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून रूतून बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या आग्रहामुळं राज्यातील सत्ता स्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मात्र, मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे.

राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदही वाटून घेण्याचे ठरले नव्हते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यानंतर सत्तावाटपाच्या चर्चेचे गाडे रुळावरून घसरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोजच भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधून, शिवसेनेला अन्य पर्याय खुले असून काँग्रेस-एनसीपी’च्या पाठिंब्यावर सरकार येऊ शकते, असे इशारे देत आहेत. लोकसभा निवडणुकीत युती होण्याआधीही राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण होते. मात्र आता राऊत अतिरेक करीत आहेत, अशी भारतीय जनता पक्ष नेत्यांची भावना असून शिवसेना नेतृत्व त्यांना रोखत नसल्याने भारतीय जनता पक्षानेते नाराज आहेत.

पंतप्रधान मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या