नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत असून तेथे महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दिल्लीमध्ये जाऊन आज देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे युती शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही.

राज्यातील सत्तास्थापनेबाबत राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. जवळपास ४० मिनिटे चाललेल्या या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि राज्यातील सत्ता समीकरणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवर मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक संपन्न झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

फडणवीसांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना युतीचा उल्लेख टाळला