8 May 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

पिंपरी: २०१२ मध्ये मनसेत नगरसेवक व ओळख, तर २०१७ ला कोलांटी घेत भाजपातून थेट महापौर

पिंपरी-चिंचवड : शेती करण परवडत नसल्याने १०वी होताच राहुल जाधवांनी ५ वर्षे रिक्षा चालवली. त्यानंतर २००६ मध्ये मनसेत प्रवेश करून २०१२ मध्ये ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, २०१७ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधून निवडून आले.

आता राहुल जाधव यांची पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी निवड होणार आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये मनसेतून भाजपध्ये दाखल झालेले राहुल जाधव नगरसेवक पदी पुन्हा निवडूण आल्यानंतर, त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणारा भाजपचा हा दुसरा महापौर असणार आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या राहुल जाधव यांनी आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात पाच वर्षे रिक्षा चालवलेली आहे.

भोसरीच्या आमदारांना २०१४ च्या मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडून आणण्यात दोघांचाही मोठा वाटा आहे. स्थानिक आमदार दादांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांची स्थायी समितीवर लगेचच नेमणूक झाली होती. मात्र, स्थायी समितीचे अध्यक्षपद न मिळाल्याने, त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते थेट पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x