5 May 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

'फडणवीस परत आले', पण मुख्यमंत्री नाही तर 'महाराष्ट्राचे सेवक' बनून

Devendra Fadnavis, NCP, Congress, Shivsena

मुंबई: युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्ष-सेनेत मतभेदांमुळे सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद होते. भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला वेळेत सत्ता स्थापनेसाठी दावा करता आला नाही. त्यासाठी वेळ वाढवून मागितली मात्र, राज्यपालांनी त्यासाठी नकार दिला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राष्ट्रपती राजवट लागू होतात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपुष्टात आली. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे असलेलं काळजीवाहू मुख्यमंत्रिपद काढलं असून तिथं महाराष्ट्र सेवक असं लिहलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी नावापुढे काळजीवाहू मुख्यमंत्री असं लिहिलं होतं. आता तोसुद्धा काढून टाकला आहे.

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. मागील अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मनाने जवळ आले आहेत. इतकेच नव्हे, हे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्यातील या जवळीकीमुळं राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेची शक्यता बळावली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत भाष्य केल्याची माहिती आहे. ‘आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नाही,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x