3 May 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेना एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; एनडीए'तुन बाहेर पडल्यात जमा?

NDA, BJP, Shivsena

मुंबई: भारतीय जनता पक्षाला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे नेते आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेणार आहेत. याशिवाय, सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आज अनेक बैठका अपेक्षित आहेत.

दरम्यान, सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतले आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भारतीय जनता पक्षाचाच असेल असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, राज्यात क्रमांक एकचा पक्ष भारतीय जनता पक्षाच आहे. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ ११९ होते.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x