2 May 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

VIDEO- भाजपकडून राज्यात शेतकऱ्यांसाठी कळवळा तर यूपीत शेतकऱ्यांवर तुफान लाठीचार्ज

Transform Ganga Project, Farmers Protest against Yogi Sarkar, Unnav

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.

मात्र, भाजपाला याची चुणूक लागताच देवेंद्र फडणवीस लगबगीने राज्यपालाच्या भेटीला गेले आहेत. तत्पूर्वी अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात सत्ता जाताच शेतकऱ्यांचा कळवळा आलेल्या भाजपाची शेतकऱ्यांच्या बाबतीतील दुतोंडी भूमिका समोर आली आहे. कारण उत्तर प्रदेशातील उन्नाव’मध्ये गंगा निर्माण प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन करताच, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविरुद्ध भाजप सरकारकडून दंडुकेशाहीचा वापर असं वापर करत आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Yogi Sarkar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x